Tuesday, 22 September 2020

भेट

 

आहे आशेचा किरण मनात तीव्र कुठेतरी

भेटशील आज ना उद्या जगाच्या पाठीवरी 


हजारो प्रश्न विना उत्तर आहेत माझ्या सामोरी 

करशील का समाधान या प्रश्नांच येऊन तू कधीतरी


आठवण तुझी बेचैन करते हृदयाला वरचेवरी

धूसर छवी तुझी अशा वेळी उमटते बघ गाभारी


नयनांत प्रतिबिंब तुझे अस्पष्ट असले जरी

आसवांच्या रूपाने ओघळेल हळूच असेच केव्हातरी


स्वप्नेही होतात नाराज विरह हा टोचे खोलवरी

जपून ठेवली मी ही आसवे तुझ्याचसाठी आजवरी 



© प्रतिभा बिळगी "प्रीति"


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home