Friday, 7 June 2024

सूर्यास्त

 


सूर्यास्ताच्या वेळी, अथांग या समुद्र किनारी
थंड गार वाऱ्याने, अंग सारे शहारी

असावा अशा वेळी, हात तुझा हाती
हळूच गुंफू दे, प्रेमाची नाजूक नाती

घे प्रिया जवळी, आवळ तुझी घट्ट मिठी
श्वासात श्वास मिळू दे, सोडव सगळ्या गुंतलेल्या गाठी

रंग पसरले सांज वेळी, कला ही जणू अनोखी
आकाशाशी स्पर्धा करे, मन वेडं बनून पारखी

लाटा उधळतात ज्या वेळी, भरकटते मन अजूनही
अशीच प्रित जगू दे, ऋदयात खोल तुझ्या आजही

© प्रतिभा बिलगी "प्रीति"


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home